कधी कधी धुंदीतुन सावरतो तेंव्हा विचार करतो की मी नक्की कोण आहे... वळिवाच्या अल्लड पावसाचा एक मस्तवाल थेंब ? का... तिच्या केसातल्या ओल्या वीणेवर, त्याच्या शापीत बोटांनी छेडलेला मोहाचा राग ? स्वत:वरंच भाळून चढलेल्या नशेमुळं उठणारा रातराणीच्या श्वासातला गंध ? का... आपल्या उन्मत्त गंधाच्या अस्मितेनं माजलेला एक बेफाम मोगरा... ? किंवा... ओल्याचिंब धुक्याची जहाल बरसात, चांदण्यांच्या ओठातुन पिऊन झिंगणा-या रात्रीला सावरणारा स्वच्छंदी ढग आहे मी ? मी नक्की कोण आहे ? मनस्वी वणवा... रिमझीम पाऊस.... हळवा प्राजक्त.... की वाद्ळी उन्माद ? ह्या सगळ्याची उत्तरं सापडता सापडता पुन्हा कसलीतरी धुंदी चढते.... आणि मग... मोठ्या मुश्किलीनं मलाच सापडलेला मी पुन्हा हरवुन जातो.... थोडक्यात... 'मी कोण' हा प्रश्न अनुत्तरीतच !
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||